Alexander Fleming Essay in Marathi |Alexander Fleming Nibandh
सर अलेक्झांडर फ्लेमिंग हे ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ, औषधतज्ञ. त्यांचा जन्म ६ ऑगस्ट १८८१ रोजी स्कॉटलंडमधील लोकफेल्ड या ठिकाणी झाला.
त्यांनी केलेल्या पेनिसिलीनच्या संशोधनाबद्दल व त्याचा प्रतिजैविक म्हणून वापराच्या शोधाबद्दल त्यांना १९४५ मध्ये नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.
त्यांच्या या शोधाने वैद्यकक्षेत्रात प्रतिजैविकांचे युग चालू झाले व त्यामुळे अनेक अवघड जीवघेण्या रोगांवर मात करणे शक्य झाले.
त्यांच्या पेनिसिलीनच्या शोधाबद्दल कहाणी प्रसिद्ध आहे. त्यांनी जीवाणूंचे ताटलीमध्ये कल्चर तयार केले होते. या कल्चरमध्ये चूकून पेनिसिलिन नामक बुरशी येउन पडली व त्यामुळे जीवाणूंचे संपूर्ण कल्चर मृत झाले. आपले श्रम वाया गेले म्हणून फ्लेमिंग ती ताटली फेकून देणार होते. परंतु त्याचवेळेस हे कल्चर का मृत झाले याबद्दल जिज्ञासा निर्माण झाली व पेनिसिलीन ही बुरशी जीवाणूंसाठी मरण आहे हे लक्षात आले व प्रतिजैविकांचा शोध लागला.
प्लिज नोट: मला आशा आहे तुम्हाला हा अलेक्झांडर फ्लेमिंग वर निबंध (Alexander Fleming Essay in Marathi) आवडला असेल.
जर तुमच्या कडे सुद्धा Alexander Fleming Nibandh वर अशाच प्रकारे कोणता निबंध असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंद करा. आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुम्ही दिलेला निबंध खूप लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करु..
तसेच तुम्हाला हा अलेक्झांडर फ्लेमिंग वर मराठी निबंध आवडला असेल तर Whatsapp आणि facebook द्वारे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.