डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती वर निबंध | Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Essay in Marathi

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Essay in Marathi |Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Nibandh

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Essay in Marathi: भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारतावर ब्रिटिश राज्य करत होते. सारी जनता ब्रिटिशांपुढे हतबल झाली होती तरी अशा परिस्थितीतही काही लोक धैर्याने ब्रिटिशांना लढा देण्यास उभे राहिले आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. अशा हुतात्म्यांचा नावे भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षराने कोरली गेलेली आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आणि भारताला एक स्वतंत्र देश म्हणून आपल्या पायावर उभे रहाण्यात खूप लोकांनी मोलाचा वाटा आहे आणि अशाच काही थोर व्यक्तींपैकी एक म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार होते.

१४ एप्रिल हा दिवस बाबासाहेबांचा जन्मदिवस. हा दिवस संपूर्ण भारतात बाबासाहेब आंबेडकर जयंती म्हणून साजरा केला जातो. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला भीमजयंती म्हणून हि ओळखले जाते. बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या निमित्ताने शाळांमध्ये आनंद महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनावर निबंध, भाषण, जीवन चरित्र, जीवन परिचय, लिहिण्यास सांगितले जाते. म्हणूनच या लेखामध्ये आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जीवनातील सर्व माहिती मराठी भाषेमध्ये दिली आहे. ह्या लेखामध्ये तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचे बालपण, कुटुंब, शिक्षण, त्यांचे समाजकार्य, त्यांचे सुविचार, विचार, त्यांनी लिहिलेली पुस्तके यांबद्दल माहिती मिळेल. हि माहिती तुम्हला बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर निबंध, भाषण, परिच्छेद लिहिण्यास मदत करेल. चला तर मग सुरु करूया.

बाबासाहेब आंबेडकर हे एक थोर समाजसुधारक होते त्याच बरोबर ते एक नेते, अर्थतज्ज्ञ, आणि उत्कृष्ट कायदेपंडित होते. बाबासाहेब आंबेडकर सदैव दलितांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आणि त्यांना समाजामध्ये समान न्याय आणि वागणूक मिळवून देण्यासाठी झटत राहिले. त्यांचे संपूर्ण आयुष्य हा जातीय भेदभाव आणि अस्पृश्यतेविरुद्धचा लढाच म्हणावं लागेल.

बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी महू (जे आता मध्यप्रदेश मध्ये आहे) येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांचा जन्म एका गरीब दलित कुटुंबात झाला होता. त्यावेळी दलितांना समाजामध्ये अमानुष वागणूक मिळत असे व खूप भेदभाव केला जाई. दलित मुलांना शाळेत प्रवेश होते पण त्यांना वेगळे बसवण्यात येई आणि त्याचबरोबर त्यांना बसण्यासाठी घरून स्वतःचे गोणपाट आणावे लागत असे. त्यांना पाण्याच्या भांड्यांना हात लावण्याची परवानगी नव्हती. शाळेतील शिपाई उंचावरून त्यांच्या हातावर पाणी ओतायचे. आणि जेव्हा योनी शिपाई नसेल तेव्हा त्यांना तसेच तहानलेले राहावे लागत असे. बाबासाहेब आंबेडकर अशाच विद्यार्थ्यांपैकी एक होते. त्यांनी ह्या सर्व गोष्टींना तोंड देत आपले शिक्षण पूर्ण केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलित समाजातील पहिले विद्यार्थी होते ज्यांनी एल्फिन्स्टन हायस्कुल मध्ये १८९७ मध्ये प्रवेश घेतला होता. त्यांनी १९०७ मध्ये मॅट्रिक ची परीक्षा पास केली आणि मुंबई विद्यापीठाच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. १९१२ मध्ये त्यांनी अर्थशास्त्रामध्ये पदवी मिळवली आणि जून १९१५ मध्ये एम. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले. १९२७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थशास्त्रामध्ये पी. एच. डी. मिळवली. त्यावेळी भारतामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे असे एकमेव व्यक्ती होते ज्यांच्याकडे इतकी उच्च पदवी होती. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि कोलंबिया युनिव्हर्सिटी मधूनही पदव्या संपादन केल्या होत्या. त्यांनी एक शिक्षक आणि अकाउंटंट चे काम सुरु केले आणि सोबत स्वतःचा व्यवसाय हि सुरु केला. पण जेव्हा त्यांच्या ग्राहकांना समजले कि ते दलित आहेत तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली आणि त्यांचा व्यवसाय बंद झाला.

जेव्हा दलितांची मदत करण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितांना मदत करण्यासाठी उभे राहिले. त्यांनी दलितांचा विकास करण्यास आणि त्यांना समान हक्क आणि न्याय मिळवून देण्यास मदत केली. त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध लढा दिला. त्यांनी दलतांसाठी सार्वजनिक पाणपोई सुरु करण्यासाठी मोर्चे काढण्यास सुरुवात केली. महाड मधील चवदार टाळ्याला सत्याग्रह जगप्रसिद्ध आहे. त्यांनी दलितांना मंदिरांमध्ये प्रवेश हि मिळवून दिला.

दलितांसाठी लढण्याबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचा आर्थिक आणि सामाजिक कणा मजबूत करण्यासाठीही योगदान दिले. अर्थशास्त्र आणि राजनैतिक क्षेत्रातही त्यांनी खूप मोलाचे काम केले. भारतीय संविधानाचे ते शिल्पकार होते. त्यांनी महिलांचा आणि मजुरांच्या हक्कांसाठी लढा दिला. मुंबई मधील गव्हर्नमेंट कायदा कॉलेज चे ते २ वर्ष प्रिन्सिपॉल हि होते. देशातील अस्पृश्यता दूर करण्यासाठी आणि दलितांना समान न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी शेवटपर्यंत लढा दिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू

६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू झाला. हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या मृत्यूनंतर १९९० मध्ये त्यांना भारत रत्न पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या सन्मानार्थ अनेक इमारती, क्रीडांगणे, महाविद्यालये, आणि सार्वजनिक ठिकाण त्यांचे नाव देण्यात आले.

प्लिज नोट: मला आशा आहे तुम्हाला हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती वर निबंध (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Essay in Marathi) आवडला असेल.

जर तुमच्या कडे सुद्धा Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Nibandh वर अशाच प्रकारे कोणता निबंध असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंद करा. आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुम्ही दिलेला निबंध खूप लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करु..

तसेच तुम्हाला हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती वर मराठी निबंध आवडला असेल तर Whatsapp आणि facebook द्वारे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

Leave a Comment