अश्मयुगापासून आजपर्यंत वर निबंध |From the Stone Age to the present day Essay in Marathi |From the Stone Age to the present day Nibandh

From the Stone Age to the present day Essay in Marathi |From the Stone Age to the present day Nibandh

आरशांचा उल्लेख रामायण-महाभारतातही आढळतो. ग्रीक, रोमन, आपली सिंधु संस्कृती यांच्या भरभराटीच्या कालखंडातही आरशांचा उपयोग होत असल्याचे पुरावे मिळालेले आहेत. संथ जलाशयाच्या पाण्यात डोकावून पाहताना आपणच आपल्याकडे पाहत असल्याचं दिसल्यापासून ही जादू आपल्या घरच्या घरीच हस्तगत करण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यातूनच मग आरशांच्या निर्मितीला चालना मिळाली. पण हे प्राचीन आरसे म्हणजे कोणत्या तरी धातूच्या घासून घासून गुळगुळीत केलेल्या पत्र्यांचेच बनवलेले असत. त्या पत्र्यांमध्ये समोरच्या वस्तूंचं स्वच्छ प्रतिबिंब पडत असे. त्यामुळं त्यांचा आरसा म्हणून वापर करणं शक्य आणि सोपं झालं होतं. आरशांसाठी काचेचा वापर बाराव्या तेराव्या शतकांपासूनच सुरु झाला असला तरी मोठ्या प्रमाणात त्याचा उपयोग होईपर्यंत सोळावं शतक उजाडलं होतं. त्यासाठी प्रथम सपाट काचेची निर्मिती होणं आवश्यक होतं.

तशी अश्मयुगापासून काचेची माहिती मानवाला झालेली असली तर त्या कालखंडात काचेच्या लहान लहान मण्यांपुरताच काचेचा वापर होत होता. यापैकी काही काचा नैसर्गिक प्रक्रियेपोटी तयार झालेल्या असत. तर काही काचांची निर्मिती मातीच्या भांड्यावर निरनिराळे मुलामे चढवून त्यांची झळाळी वापरण्यासाठीच केली जात होती. सपाट काच तयार व्हायला लागल्यानंतरच काचेच्या गुणधर्मांची माहिती मिळाली आणि त्यातही वस्तूंचं प्रतिबिंब दिसू शकतं, याचं ज्ञान झालं. त्यानंतरच मग आज वापरल्या जाणार्‍या, काचेपासून बनवलेल्या आरशांची निर्मिती होऊ लागली. सोळाव्या शतकात व्हेनिसमध्ये पारदर्शक काचेच्या पाठी टिन आणि पारा यांच्या मिश्रधातूचा पत्रा लावून पहिला आधुनिक आरसा बनवण्यात आला.

त्यानंतर दोन शतकांनी असा पत्रा लावण्याऐवजी मिश्रधातूचा नितळ मुलामा दिलेल्या काचेचं आरशात रुपांतर करण्यात जर्मन कारागिरांना यश आलं. आजच्या आरशांमध्ये अल्युमिनियम किंवा चांदी यांचा गरम फवारा काचेवर मारण्यात येतो. त्याचा सलग थर तिथं जमा होऊन तो थंड झाला की त्या काचेचा आरसा तयार होतो. दुर्बिणींमध्ये वापरल्या जाणार्‍या आरशांमध्ये मात्र हा थर काचेच्या पाठीमागच्या बाजूला न देता समोरच्याच बाजूला देण्यात येतो. त्यामुळं निव्वळ काचेकडून होणार्‍या प्रकाशाच्या परावर्तनाला अटकाव करता येतो.

प्लिज नोट: मला आशा आहे तुम्हाला हा अश्मयुगापासून आजपर्यंत वर निबंध (From the Stone Age to the present day Essay in Marathi) आवडला असेल.

जर तुमच्या कडे सुद्धा From the Stone Age to the present day Nibandh वर अशाच प्रकारे कोणता निबंध असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंद करा. आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुम्ही दिलेला निबंध खूप लोकांपर्यंत  पोचवायचा प्रयन्त करु..

तसेच तुम्हाला हा अश्मयुगापासून आजपर्यंत वर मराठी निबंध आवडला असेल तर Whatsapp आणि facebook द्वारे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

Leave a Comment