घरात हवे आजी – आजोबा वर निबंध | Grandparents should be at Home Essay in Marathi | Grandparents should be at Home Nibandh

Grandparents should be at Home Essay in Marathi | Grandparents should be at Home Nibandh

आजी – आजोबांचे प्रेम । त्याला बासुंदीची गोडी

त्यांच्या प्रेमासाठी । आम्ही मुलं वेडी

असं मला वाटतं आणि आजीला काय वाटतं आमच्या सांगू तुम्हाला?

दुधापेक्षा साय गोड । नातवंडांच्या प्रेमाला I जगात नाही तोड

आजी – आजोबा का हवे असतात सांगू? आमच्यावर संस्कार करायला, संध्याकाळी श्लोक शिकवायला, झोपताना गोष्टी सांगायला, माया करायला, घरात आजी आजोबा हवेच.

बाबा कामावर जातात. आईपण नोकरी करते, त्यांना वेळ नसतो पण आजी आजोबा मात्र घरी असतात, आम्हाला सांभाळतात. आई रागावल्यावर आजीच्या पदराखाली आजी घेते आणि काय चुकले ते गोडीने सांगते. बाबांचा धपाटा चुकतो आजोबांच्यामुळे.

शाळेतून आल्यावर घर उघडे असते. हसत मुखाने आजी समोर येते. दप्तर जागेवर ठेऊन, हातपाय धुवून जेवायला ये असा हुकूम देते आपोआपच ती सवय लागते. गरमगरम जेवण आजी वाढते, सगळ्या भाज्या खाण्यास बजावते आणि खायला पण लावते, मुरंबा, सुधारस शिकरण काहीतरी गोड पण देते. जेवण होईपर्यंत जवळ बसते. जेवायला बसताना वदनी कवळ घेता म्हणायला लावते, जेवण झाल्यावर पान स्वच्छ करून उचलायला लावते.

मला आजीमुळे शिस्त लागली आहे. माझी प्रकृती चांगली आहे कारण आजी मला सगळ्या भाज्या, कोशिंबिरी खायला लावते. सगळ्या वर्गात माझे वाचन छान आहे, जेवणानंतर आजोबाना पेपर वाचून दाखवण्याचे काम माझे आहे. कारण स्वच्छ, अर्थ समजून आवाजाचे चढ उतार घेऊन कसे वाचायचे ह्याची शिकवणी असते ती.

स्वातंत्र्याचा सगळा इतिहास मला आजोबांनी सांगितला आहे. सणाच्या दिवशी उकडीचे मोदक, धिरडी, वाटलीडाळ, पुरणपोळी, गुळाची पोळी आजी आवर्जून करते. आजीच्या हाताला छान चव आहे कारण ते पदार्थ ती प्रेमाने करते.

तिला खूप अभंग, ओव्या पाठ आहेत. सकाळी काम करताना आजी ते गुणगुणत असते. मला वक्तृत्वात नेहेमी नंबर मिळतो कारण माझे आजोबा. ते तयारी करून घेतात.

माझे आजी आजोबा म्हणजे नवं आणि जुनं यांचा संगम आहे. नवीन नवीन पदार्थ खा म्हंटले तर आजोबा चमचाभर तरी खून पाहतात आणि छान आहे म्हणतात, नवी विजेची उपकरणे आजी सहजगत्या वापरते.

खरंच आजी-आजोबा घरात असणे म्हणजे देवघरात देव असणं.

प्लिज नोट: मला आशा आहे तुम्हाला हा घरात हवे आजी – आजोबा वर निबंध (Grandparents should be at Home Essay in Marathi) आवडला असेल.

जर तुमच्या कडे सुद्धा Grandparents should be at Home Nibandh वर अशाच प्रकारे कोणता निबंध असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंद करा. आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुम्ही दिलेला निबंध खूप
लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करु..

तसेच तुम्हाला हा घरात हवे आजी – आजोबा पर मराठी निबंध आवडला असेल तर Whatsapp आणि facebook द्वारे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

Leave a Comment