Gurupournima Essay in Marathi | Gurupournima Nibandh
आषाढ सुद्धा पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा असे म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी, आचार्य झालेले नाहीत, अशी आपली श्रद्धा आहे. अशा या आचार्यांना साक्षात् देवाप्रमाणे मानव असे शास्त्रात कथन केले आहे. ‘व्यासोच्छिम् जगत् सर्वम्’ असे त्यांच्यासंबंधी लिहिले गेले आहे. एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जातात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानवशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला. ज्ञानियांचा राजा म्हणून ज्याला मानतात, त्या ज्ञानदेवांनीसुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना ‘व्यासांचा मागोवा घेऊ ‘ असे म्हणून सुरुवात केली.
व्यासपौर्णिमेच्या दिवशी ‘ॐ नमोस्तुते व्यास, विशाल बुद्धे ‘ अशी प्रार्थना करून, त्यांना प्रथम वनडेत करण्याचा प्रघात आहे, परंपरा आहे. आपल्या देशात रामायण-महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा आहे. आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विड्याच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करित असतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय. महर्षी व्यसनापासून अशी प्रथा रूढ झाली, ती आजमितीपर्यंत.
आपण कोणाचे तरी शिष्य आहोत, या भावनेत एक कृतज्ञता वाटते. भारतीय गुरुपरंपरेत गुरुशिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. जनक-याज्ञवल्क्य, शुक्राचार्य-जनक, कृष्ण, सुदाम-सांदिपनी, विश्वामित्र-राम, लक्ष्मण, परशुराम-कर्ण, द्रोणाचार्य-अर्जुन, अशी गुरु शिष्य परंपरा आहे. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पहिली कि सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही.
भगवान श्रीकृष्णांनी गुरूच्या घरी लाकडे वाहिली. संत ज्ञानेश्वरांनी वडीलबंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले तर संत नामदेव साक्षात् विठ्ठलाशी भाष्य करित असत. त्या नामदेवांचे गुरु होते विसोबा खेचर. भारतीय संस्कृतीत गुरूला नेहमीच पूजनीय मानले आहे. गुरुपौर्णिमा हि सद्गुरूची पौर्णिमा मनाली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा, म्हणून गुरुची प्रार्थना करावयाची, तो हा दिवस होय.
गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घाटाने- घागरीने आपली मन खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याचप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. ‘गुरु बिन ज्ञान काहांसे लाऊं ?’ हेच खरे आहे.
गुरूच्या उपकरणांनी आपले मन कृतज्ञतेने भरून येते, तेव्हा आपला तोंडून श्लोक बाहेर पडतो –
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु
गुरुर्देवो महेश्वरः ।।
गुरु साक्षत् परब्रह्म
तस्मै श्री गुरुवे नमः ।।
प्लिज नोट: मला आशा आहे तुम्हाला हा गुरुपौर्णिमा वर निबंध (Gurupournima Essay in Marathi) आवडला असेल.
जर तुमच्या कडे सुद्धा Gurupournima Nibandh वर अशाच प्रकारे कोणता निबंध असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंद करा. आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुम्ही दिलेला निबंध खूप लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करु..
तसेच तुम्हाला हा गुरुपौर्णिमा वर मराठी निबंध आवडला असेल तर Whatsapp आणि facebook द्वारे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.