Independence Day (August 15) Essay in Marathi |Independence Day (August 15) Nibandh
पेशवाईच्या अस्ताबरोबर मराठ्यांची मर्दुमकी संपली आणि कधीच ना मावळण्याची इंग्रजांचा सूर्य उगवला. जोपर्यंत या सूर्याची प्रखरता जनमानसाला जाणवत नव्हती, तोपर्यंत इंग्रज लोक आपल्या मर्जीप्रमाणे वागले. इंग्रजरूपी सूर्य जेव्हा डोक्यावर आला, तेव्हा त्याचा प्रखर किरणांनी हिंदुस्थानी जनता हैराण झाली. पारतंत्र्यात गेल्यानंतर त्यातून सुटका होणे कठीण असते. इंग्रजांच्या सैन्याशी लढणे कठीण काम होते. परंतु लोकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. हिंदुस्थानी लोकांनी इंग्रजांविरुद्ध इ.स. १८५७ साली प्रथम बंड केले पण त्यांना यश मिळाले नाही.
सन १७७८ मध्ये देशी छापखान्यांचा कायदा व हत्यारबंदीचा कायदा करण्यात आला. त्यामुळे हिंदुस्थानी लोकांच्या वर्तमानपत्रावर नियंत्रण आले व दुसऱ्या कायद्याने हिंदी लोकांना निःशस्त्र करण्यात आले. हिंदी लोकांना व इंग्रजांना दिल्या जाणाऱ्या न्यायातही भेदभाव नजरेस येऊ लागला आणि हिंदी लोकांचे पुन्हा डोळे उघडले आणि संघटनेशिवाय सर्व व्यर्थ आहे, हे कळून चुकले. म्हणून हिंदी लोकांच्या सामाजिक, राजकीय, नैतिक व मानसिक उन्नतीसाठी संस्था स्थापन करण्याचा विचार पुढे आला. त्यातून ‘इंडियन नॅशनल काँग्रेस ‘ची स्थापना केली गेली. काँग्रेस आपल्या अधिवेशनात हत्यारबंदीच्या कायद्यात फेरफार, लष्करी खर्चात कपात, सनदी नोकऱ्यांचे हिंदीकरण, हिंदुस्थानातील उद्योगधंद्यांना उत्तेजन, समान वर्तन, अशा तर्हेचे ठराव करून सरकारकडे पाठवत. परंतु या प्रश्नांची उपेक्षा होई. लोक चिडून जात असत. त्या वेळी भारतीय जनतेला टिळकरूपाने पुढारी मिळाला. ते जहाल व राष्ट्रवादी होते. त्यांनी आपल्या ‘केसरी ‘ वर्तमानपत्रातून लोकांमध्ये स्वावलंबन व स्वदेशीचे प्रेम आणि राष्ट्रीय जागृती उत्पन्न करण्याचे महान प्रयत्न केले.
१९२० ला टिळकांचे निधन झाले. सारा देश ओक्सबोक्शी रडला. आता लोक निवळतील, अशी इंग्रजांना खात्री वाटू लागली. परंतु घडायचे वेगळेच होते. महात्मा गांधी आफ्रिकेतून भारतात आले आणि स्वातंत्र्य-संग्रामात उतरले. सत्याग्रह, असहकार व हातात शस्त्र न घेता प्रतिकार या त्रिसूत्रीची योजना ठरवून, अंमलात आणली. सतत झगडून इंग्रजांना हैराण केले. याच काळात क्रांतिकारक पक्षही काम करीत होते. काँग्रेसचे व क्रांतिकारकांचे ध्येय एकाच होते, परंतु मार्ग भिन्न होते.
८ ऑगस्ट १९४२ साली काँग्रेसच्या अखिल भारतीय समितीने ‘भारत छोडो’ची घोषणा दिली आणि अहिंसात्मक लढा सुरु केला. सारा देश पेटून उठला. हिंदुस्थानला स्वातंत्र्य देण्यावाचून पर्यायच उरला नाही. १५ ऑगस्ट १९४७ साली आपला देश स्वतंत्र झाला. पारतंत्र्याची बेडी तुटली.
असा हा स्वतंत्रच लढा १८५७ पासून सुरु झाला होता. त्याला आज यश आले होते. शेकडो वर्षे गुलामगिरीच्या जोखडात अडकून पडलेला हिंदुस्थान स्वतंत्र झाला. गांधीजींनी असहकाराच्याद्वारे हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देऊन एक जागतिक विक्रमच केला. या स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारकांचा वाटा पण फार मोठा होता. भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, मदनलाल धिंग्रा, चाफेकर बंधू, स्वा. सावरकर अशा अनेक क्रांतिकारकांनीसुद्धा इंग्रजांना सळो कि पळो करून सोडले. ‘पिचेल मनगट परी, उरतील अभंग आवेश ‘ या आवेशाने लढले, झुंजले. अनेकांना बलिदान करावे लागले. तेही ‘आज आमची सरणावरती पेटताच प्रेते, त्या ज्वाळातून उठतील भावी क्रांतीचे नेते’ ह्याच विश्वासाने. त्यांनी ज्या स्वप्नासाठी बलिदान केले, त्याग केला, ती स्वप्ने या आपण साकार करूया.
दास्यशृंखलांनी बद्ध झालेल्या देशाला त्या वेळी तरुणांनी मुक्त केले. आजही विषमतेची शृंखला दूर करून, आपण आपला देश बलशाली करूया.
जय हिंद !
प्लिज नोट: मला आशा आहे तुम्हाला हा स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) वर निबंध (Independence Day (August 15) Essay in Marathi) आवडला असेल.
जर तुमच्या कडे सुद्धा Independence Day (August 15) Nibandh वर अशाच प्रकारे कोणता निबंध असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंद करा. आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुम्ही दिलेला निबंध खूप लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करु..
तसेच तुम्हाला हा स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) वर मराठी निबंध आवडला असेल तर Whatsapp आणि facebook द्वारे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.