लाल बहादूर शास्त्री वर निबंध | Lal Bahadur Shastri Essay in Marathi | Lal Bahadur Shastri Nibandh

Lal Bahadur Shastri Essay in Marathi | Lal Bahadur Shastri Nibandh

लाल बहादूर शास्त्री हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक स्वातंत्र्यसैनिक होते. तसेच भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान होते. लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ साली वाराणसी येथे झाला. त्यांचा जन्म एका गरीब कुटुंबामध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव रामदुलारी होते तर वडिलांचे नाव शारदा प्रसाद होते. त्यांचे वडील एका प्राथमिक शाळेत शिक्षक होते. ते दिड वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर सर्व कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या आईवर पडली. लाल बहादूर शास्त्री यांचे प्राथमिक शिक्षण मिर्झापूर येथे झाले तर माध्यमिक शिक्षण वाराणसीला झाले. तेथे त्यांना एक गुरु भेटले त्यांचे नाव निल्कामेश्वर प्रसाद. त्यांनी महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, लाला लजपत राय यांच्या जीवनाविषयीचे महत्व लाल बहादूर शास्त्री यांना सांगितले. लाल बहादूर शास्त्री यांचे मूळ आडनाव श्रीवास्तव असे होते. काशी विद्यापीठातून त्यांना ‘शास्त्री’ ही पदवी मिळाली. वयाच्या ११ व्या वर्षी बनारस हिंदू विश्वविद्यालय येथे त्यांना गांधीजी दिसले. गांधीजींनी केलेल्या भाषणाने ते भारावून गेले. गांधीजींचे विचार त्यांच्या मनात घर करून बसले. त्यानंतर त्यांनी गांधीजींची पाठ सोडली नाही. चंपारण्य सत्याग्रह, रौलेट ऍक्ट आणि जालियनवालाबाग हत्याकांड इत्यादी घटनांचे पडसाद त्यांच्या मानत घर करून बसले अशाप्रकारे महात्मा गांधीजींच्या विचारांचा जबरदस्त पगडा शास्त्रीजींच्या मनावर होता. लाल बहादूर शास्त्री यांचे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करण्याचे ध्येय होते. त्यांना शिक्षणाची आवड होती तसेच त्यांना समाजसेवा करायची होती त्यामुळे त्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी न करता समाजसेवा करण्याचे ठरविले. लाल बहादूर शास्त्री देशासाठी जिथे-जिथे जातील तिथे-तिथे आपल्या मृदू व निश्चयी शब्दांनी आपली छाप पाडत असत.

लाल बहादूर शास्त्री यांनी विदेशीवर बहिष्कार टाकला आणि स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचा संदेश दिला. यासाठी त्यांनी बऱ्याच ठिकाणी जनजागृतीचे कार्यक्रम केले. त्यानंतर ते पुन्हा काशी विद्यापीठात दाखल झाले. ‘सर्व्हन्टस ऑफ द पीपल्स’ सोसायटीचे ते सदस्य झाले. इ.स. १९२८ साली लाला लजपतराय यांचे निधन झाल्यानंतर पुरुषोत्तम टंडन सोसायटीचे ते अध्यक्ष झाले. त्यानंतर अलाहाबादला ते दाखल झाले तिथे त्यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली. तेथे विधायक कार्यकर्त्यांची ती पाठशाळा होती. आचार्य नरेंद्र देव, आचार्य कृपलानी, डॉ. भगवानदास, डॉ. संपुर्णानंद, श्रीप्रकाश यांच्याशी शास्त्रीजींची मैत्री झाली. गांधीजींनी देशवासियांना असहकार चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यावेळी लाल बहादूर शास्त्री हे केवळ सोळा वर्षांचे होते. गांधीजींच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून शिक्षण सोडून देण्याचा निर्णय ठामपणे त्यांनी घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या आईच्या आशा आकांक्षांना हादरा बसला. शास्त्रींचा हा निर्णय ठाम असल्यामुळे त्यांचे कुंटुंबीय त्यांना रोखण्यामध्ये असफल झाले. कारण त्यांनी घेतलेला निर्णय ते कधीच बदलत नव्हते. त्यांचा हा स्वभाव त्यांच्या निकटच्या व्यक्तींना माहित होता. बाहेरून मृदू वाटणारे हे शास्त्री आतून एखाद्या कणखर खडकासारखे होते.

१९२७ मध्ये लाल बहादूर शास्त्री यांचा ललिता देवी यांच्याशी विवाह झाला. ललिता देवी त्यांच्याच शहराजवळील मिर्झापूर येथील होत्या. त्यांचा विवाह पारंपारिक पद्धतीने पार पडला. १९३० मध्ये महात्मा गांधीजींनी काढलेल्या दांडी यात्रेत ते सहभागी झाले. त्यावेळी गांधीजींनी मिठाचा कायदा मोडला. या प्रतिकात्मक संदेशाने संपूर्ण देशात क्रांती घडून आली. त्यावेळी लाल बहादूर शास्त्री पेटून उठले आणि स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले अशा अनेक विद्रोही मोहिमांचे किंवा लढ्यांचे त्यांनी नेतृत्व केले आणि एकूण सात वर्षे ब्रिटिश तुरुंगवासात घालवली. स्वातंत्र्याच्या या संग्रामाने ते अधिकच परिपक्व झाले.

प्लिज नोट: मला आशा आहे तुम्हाला हा लाल बहादूर शास्त्री वर निबंध (Lal Bahadur Shastri Essay in Marathi) आवडला असेल.

जर तुमच्या कडे सुद्धा Lal Bahadur Shastri Nibandh वर अशाच प्रकारे कोणता निबंध असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंद करा. आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुम्ही दिलेला निबंध खूप लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करु..

तसेच तुम्हाला हा लाल बहादूर शास्त्री वर मराठी निबंध आवडला असेल तर Whatsapp आणि facebook द्वारे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

Leave a Comment