महाराष्ट्र दिन १ मे वर निबंध | Maharashtra Day 1 May Essay in Marathi | Maharashtra Day 1 May Nibandh

Maharashtra Day 1 May Essay in Marathi | Maharashtra Day 1 May Nibandh

दरवर्षी १ मे हा दिवस भारतामध्ये महाराष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस १ मे १९६० रोजी झालेल्या बॉम्बे स्टेट मधून महाराष्ट्र राज्य स्थापनेचा दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतातील राज्ये हि भाषेचा प्रसार आणि सीमेनुसार मर्यादित केली गेलेली आहेत. बॉम्बे प्रदेशही आखणी हि स्टेट रीऑरगॅनिझशन ऍक्ट च्या अंमलबजावणीनुसार केले गेली होती ज्यामध्ये मराठी, कोकणी, गुजराती, कुची, या भाषा सर्वाधिक बोलल्या जायच्या. नंतर बॉम्बे राज्य दोन राज्यांमध्ये विभागले गेले आणि ती राज्ये होती महाराष्ट्र आणि गुजरात. हि मोहीम संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेतृत्वाखाली राबवली गेली. हा कायदा १ मे १९६० रोजी अमंलात आणला गेला आणि तेव्हापासून १ मे हा दिवस दरवर्षी महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो.

महाराष्ट्र दिन कसा साजरा केला जातो?

महाराष्ट्र दिन हा प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. ह्या दिवशी अनेक शासकीय, मनोरंजन, आणि पारंपारिक कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित केले जातात. ह्या दिवशी लोक छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या थोर लोकांचा सन्मान करतात. शाळा आणि महाविद्यालयांना शासकीय सुट्टी दिली जाते. शाळांमध्ये निबंध लेखन, भाषण स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, एकांकिका, नाटके, पोवाडे गायन, चित्रकला स्पर्धा यांसारख्या कार्यक्रमाचे आणि स्पर्धांचे आयोजन केले जाते.

लोक इंटरनेट आणि सोशिअल मीडिया चा वापर करून एकमेकाना SMS, songs, videos, quotes, images, wallpapers पाठवून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतात. गावे आणि शहरे महाराष्ट्र दिनाच्या शुभेछया देणाऱ्या बॅनर्स ने सजवली जातात. अनेक ठिकाणी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून देशभक्तीपर गीते लाऊडस्पीकर वर लावली जातात. गरज महाराष्ट्र माझा, वेदात मराठे वीर दौडले सात, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती हि काही प्रसिद्ध गाणी आहेत. ह्यादिवशी मोटारसायकल रॅली, प्रभातफेऱयांचे आयोजन केले जाते. त्यावेळी “जय भवानी, जय शिवाजी”, “जय महाराष्ट्र, जय हिंद”,यांसारख्या घोषणा दिल्या जातात.

शाळा आणि महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्र दिन कसा साजरा केला जाऊ शकतो?

महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी शाळांमध्ये अनेक स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अशाच काही स्पर्धा आणि कार्यक्रमाचे उदाहरणे आम्ही खाली दिली आहेत. ह्या स्पर्धा तुम्ही तुमच्या शाळेतही आयोजित करू शकता.

सांस्कृतिक कार्यक्रम

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ज्यामध्ये गायन स्पर्धा, पोवाडा गायन, नृत्य स्पर्धा, एकांकिका, नाटके, यांचा समावेश होतो. हे कार्यक्रम साजरे करण्यासाठी शाळा, विद्यार्थी आणि विद्यार्थी समिती एकत्र येऊन काम करू शकतात.ह्या कार्यक्रमांमार्फत विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाबद्दल माहिती मिळते.

निबंध लेखन

शाळांमध्ये निबंध लेखन स्पर्धांचे आयोजन केले जाते. निबंध स्पर्धेचे विषय हे देशभक्तीपर, अथवा इतिहासातील महत्वाच्या व्यक्तींच्या जीवनावर आधारित असतात.<br><br>

वक्तृत्व भाषण स्पर्धा

शाळांमध्ये वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन हि केले जाऊ शकते, ज्यामध्ये विद्यार्थी विविध विषयांवर आपले विचार मांडू शकतात.

चित्रकला स्पर्धा

चित्रकलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले जाऊ शकते. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या संबंधित विषयांवर चित्र काढण्यास सांगितले जाऊ शकते. जसे कि “माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र”<br><br>

सामाजिक कार्यक्रम

महाराष्ट्र दिनाचे औचीत्य साधून समाजाची मदत करण्याचे काही सामाजिक उपक्रम देखील राबवले जाऊ शकतात. विद्यार्थी शाळेजवळील आदिवासी पाड्यामध्ये जाऊन तेथीललोकांची मदत करू शकतात. रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाऊ शकते. शाळा स्वच्छता अभियान आणि गाव स्वच्छता अभियान हि राबवले जाऊ शकते. या दिवशी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम केला जाऊ शकतो.

प्लिज नोट: मला आशा आहे तुम्हाला हा महाराष्ट्र दिन १ मे वर निबंध (Maharashtra Day 1 May Essay in Marathi) आवडला असेल.

जर तुमच्या कडे सुद्धा Maharashtra Day 1 May Nibandh वर अशाच प्रकारे कोणता निबंध असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंद करा. आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुम्ही दिलेला निबंध खूप लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करु..

तसेच तुम्हाला हा महाराष्ट्र दिन १ मे वर मराठी निबंध आवडला असेल तर Whatsapp आणि facebook द्वारे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

Leave a Comment