Nature is My Friend Essay in Marathi | Nature is My Friend Nibandh
या भारत भुमीत देशाचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी.मोठ्या प्रमाणात क्रांती झाली.दुधगंगा घरोघरी पोहचण्यासाठी मोठी क्रांती झाली आणि आज आपल्या पुढे स्वप्न आहे हरीतक्रांतीचे ! का माझा देश हरितक्रांतीने नटला नव्हता? भारताला प्राचीन काळापासून जे वैभव प्रात्प होते ते कोठे गेले.
“सुजलाम सफलाम सस्यशामला मातरम”
अशी होती माझी धरणी. पण आज वेगळे वैविध्याने नटलेली पाचूच्या बेटासारखी.चित्रे माझ्या पुढे आहे.हिरवेगार असणारे डोंगर.आज ही धरती उजाड दिसत आहे.दूर दूर झाडे जिसत नाही.फार उन लागते. पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात –हास झाला.हे कशामुळे झाले.जंगल भागातील मोठे मोठे भाग आपण आधीच कापून साफ केले.त्यातील लाकूड इमारत बांधण्यासाठी,लाकडी वस्तू तयार करणयासाठी.इंधनासाठी लाकडी वस्तू तयार करण्यासाठी कागद निर्मिती करण्यासाठी सुद्धा वापरले खरे….म्हणजे जंगल हे एका प्रकारचे कोठारच आहे असं आपल्याला म्हणावं लागेल..प्राणी,पशू,सुक्ष्म जीव येथे आढळतात.आज हे सारे संपत चालले आहे.
वृक्षाची काळजी घेण्याबाबत शिवाजी महाराज कीती दक्ष होते पण आपण मात्र काय कळतयं पण वळत नाही अशी आपली स्थिती झाली आहे.पण निसर्गाच्या बाबतीत आपण सगळेच स्वार्थी झालो आहोत.पृथ्वीवर वाढत जाणारी लोकसंख्या,प्रदुषण,आणि ओद्योगिकरण या सर्वीची धोका निसर्गाला होत आहे.
हा नाश थांबवा ! हा नाश थांबवा !
ही वसुंधरा जनसंख्येच्या ओझ्याने रडत आहे.ह्या लोकसंख्ये मुळे वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होउन आज त्या ठीकाणी सिमेंटची कृत्रिम जंगले तयार झालेली दिसून येतात.जमिनीच्या वाढत्या मागणी मुळे मोठ्या प्रमाणात जंगलांचे आतिक्रमण होत आहे.जंगले नाहीशी झाली.साधन सामग्रीचा वापर यामुळे जंगलांची घट निर्माण झाली आहे.ओद्योगिक आणि वाहतूक यामुळे प्रदुषण वाढले.सुगंधी फवा-यातून आणि शीतपेयांमध्ये वापरणय्त येणा-याCFC या वायूमुळे पृथ्वीवरील सभोवताली असणा-या ओझोनच्या थराला धोका निर्माण झाला आहे त्यातूनच जागतिक तापमानाची वाढीची समस्या निर्माण झाली व अश्या समस्या तंत्रविज्ञानाच्या विकासातून उद्भवल्या आहे हे नाकारता येत नाही.तसेच अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे याचे गांभिर्य जाणले पाहीजे.प्रदुषणावर नियंत्रण ठेऊन पर्यांवरणाचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे हे आपण आळखले पाहीजे.
आपण आपल्या सुखासाठी आपला नाश ओढवून घेत आहोत.वृक्षामुळे मिळणारी शितलता,वायू,फळ,फुले सर्व काही.आज हे स्वप्न वाटु लागले आहे.माझ्या स्वप्नाची पुर्णता करायची असेल तर झाडे लावणे आवश्यक आहे.अतिरिक्त लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शासनाचे जसे प्रमाण आहे तसेच समाजाचे सुद्धा असले पाहीजे.पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला पाहीजे.वनतोड कमी प्रमाणात केली पाहीजे.एका समस्येतून दुसरी समस्या निर्माण होताना माणसाने हे लक्षात घेतले नाही की,हा आपला नाश आहे आणि आपणच आपला नाश ओढावून घेत आहे.
वृक्षवल्ली आम्हा सोयीचे वनचरे…….
असे तुकाराम महाराज म्हणतात.वृक्षाबद्दल एवढ आपण मित्रासारख सांगावं.शांतिनिकेतन सारखी शाळा वृक्षराशीच्या समवेत असावी म्हणुन रविंद्र नाथ टागोरांनी शांतिनिकेतनची स्थापना केली.माणसाच्या मनाला शांताता मिळतो तो दाट शांत गार सावलीत.ह्या भारतमातेचे सजल रुप पाहायचे असेल नंदनवन फुलवायचे असेल तर प्रत्येकाने आपला वाटा उचलला पाहीजे.झाडे लावणे,वृक्षांचे संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.कारण ती ही आपल्या सारखी सजीव !
मानवाने वाया घालवू नये क्षण
मानवाने वाया घालवू नये कण!!.
हा जीवनमंत्र स्विकारु या
आपली वसुंधरा वाचवू या!!
प्लिज नोट: मला आशा आहे तुम्हाला हा निसर्ग हाच माझा मित्र वर निबंध (Nature is My Friend Essay in Marathi) आवडला असेल.
जर तुमच्या कडे सुद्धा Nature is My Friend Nibandh वर अशाच प्रकारे कोणता निबंध असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंद करा. आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुम्ही दिलेला निबंध खूप
लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करु..
तसेच तुम्हाला हा निसर्ग हाच माझा मित्र पर मराठी निबंध आवडला असेल तर Whatsapp आणि facebook द्वारे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.