प्रदूषण – एक मुलाकात धुळीच्या आंधी सोबत वर निबंध | Pollution – accompanied by a dust storm in an interview Essay in Marathi | Pollution – accompanied by a dust storm in an interview Nibandh

Pollution – accompanied by a dust storm in an interview Essay in Marathi |Pollution – accompanied by a dust storm in an interview Nibandh

अप्रैल महिन्याच्या दुसर्या पंधरवड्यात दिल्लीत उन्हाची प्रखरता जाणवू लागते. दिवसाचे तापमान ४० अंशाच्या वर जाते. त्या सोबत दक्षिण पश्चिम दिशेहून येणारे उष्ण वारे हि दिल्लीत येऊन धडकतात. उष्ण वार्यांसोबत राजस्थानची रेत हि दिल्लीत पोहचते. पूर्वी हि धूळ लाल-पिवळी दिसायची. पण आता काळपट दिसते. दिल्लीत लाखो वाहने आणि फैक्ट्र्या रोज आकाशात धूर सोडतात. धुरावाटे नायट्रोजन, सल्फर, कार्बन यांसह घातक रासायनिक पदार्थ हवेत मिसळतात.प्रदूषित पदार्थांचे हि बारीक कण हि या धुरासोबत आकाशात पोहचतात. धुळीच्या आंधी सोबत हे सर्व प्रदूषण घरा-घरात पोहचते. डोळे लाल होणे, खोकला सुरु होणे, एलर्जी व अस्थमाचा त्रास वाढणे हे सर्व सामान्य झाले आहे. आठवड्यात किमान एकदा तरी प्रदूषित धुळीची आंधी येतेच. इतर ठिकाणी प्रचंड उन्हामुळे लू लागते पण दिल्लीत लू सोबत प्रदूषित धुळीचा त्रास हि सहन करावा लागतो.

संध्याकाळचे पाच एक वाजले असतील. जोरात आंधी सुरु झाली. खिडक्या वाजू लागल्या. धावत जाऊन खिडक्या बंद केल्या. दरवाजा बंद करताना एक स्त्री आवाज आला, गाढवा किती हि दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला तरी तू मला रोखू शकत नाही. मी चमकून इकडे-तिकडे पहिले कुणीच दिसले नाही, वाटले मनाचा भ्रम असावा. पुन्हा आवाज आला, मूर्खा, मी धुळीची आंधी बोलते आहे, कुणी मानवी स्त्री नाही, जी तुला डोळ्यांनी दिसेल. मला हि राग आला म्हणालो, तसे हि मला सध्या डोळ्यांनी काहीच दिसत नाही. तू धुळीची आंधी आहे, मान्य करतो. माझेच घर सापडले का तुला, त्रास द्यायला. जोरात हसण्याचा आवाज ऐकू आला. मी म्हणालो, हसतेच कशाला, मी काही चूक म्हंटले का, कुणालाच आवडणार नाही, तुझे घरात शिरणे. त्या वर धुळीच आंधी म्हणाली, पूर्वी मी रस्त्याच्या काठी असलेल्या झाडांवर किंवा आंगणातल्या झाडांवर विसावा घ्यायचे. तुझ्या घराच्या आंगणात एखादे पेरूचे झाड असते तरी त्यावर आपली हाडे टाकून मस्त झोपले असते. हो आलं लक्ष्यात, तुझ्या घरात आंगणच नाही, तर झाड कुठून येणार. शोभे साठी ठेवलेली प्लास्टिकची झाडे दिसत आहेत बैठकीत. चालेल, फूल न फुलाची पाकळी इथेच विसावा घेते.

मी निरुत्तर झालो, माझ्याच घरात काय, दिल्लीतल्या ८० टक्के घरांत आंगण नाही किंवा कुठले झाड हि नाही. रस्त्यांवरची झाडे हि दुकानदारांनी, आपले दुकान वाढविण्यासाठी केंव्हाच तोडून टाकली. मोठ्या-मोठ्या कोठीवाल्यांना हि त्यांच्या महागड्या कारांवर पडणारा झाडांच्या पानांचा कचरा सहन झाला नाही. त्यांनी हि झाडांना तोडून टाकले. आता धुळीच्या आंधीला विसाव्यासाठी कुठलीच जागा उरली नाही. थेट लोकांच्या घरात शिरणे तिची हि मजबुरी.

थोड्या वेळात आंधी संपली. झाडू-पोंछा घेऊन घरभर पसरलेली धूळ स्वच्छ केली. डोळ्यांत जळजळ होऊ लागली होती, खोकलता-खोकलता हालत खराब झाली होती. शेवटी नाईलाज होऊन डॉक्टर कडून औषध आणावे लागले.

प्लिज नोट: मला आशा आहे तुम्हाला हा प्रदूषण – एक मुलाकात धुळीच्या आंधी सोबत वर निबंध (Pollution – accompanied by a dust storm in an interview Essay in Marathi) आवडला असेल.

जर तुमच्या कडे सुद्धा Pollution – accompanied by a dust storm in an interview Nibandh वर अशाच प्रकारे कोणता निबंध असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंद करा. आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुम्ही दिलेला निबंध खूप लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करु..

तसेच तुम्हाला हा प्रदूषण – एक मुलाकात धुळीच्या आंधी सोबत वर मराठी निबंध आवडला असेल तर Whatsapp आणि facebook द्वारे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

Leave a Comment