Romantic evening Essay in Marathi |Romantic evening Nibandh
रम्य सायंंकाळ मराठी निबंधामध्ये आपण मुबंई आणि महाबळेश्वर येथील संध्याकाळचे वर्णन बघणार आहोत ,मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरातील ती सायंकाळ असली तरी ती रम्यच वाटते. हजारो नव्हे लाखो पावले द्रुत गतीने आपापल्या घरी परतत असतात. दिवसभर श्रम केलेले असले तरी त्या पावलांना जणू वाऱ्याचे पंख लाभलेले असतात. कारण त्यामागे ओढ असते घराकडे जाण्याची. त्यामुळे मग गाडीची गर्दी त्रासदायक वाटत नाही. कारण त्या गर्दीतील अनेक व्यक्तीच्या मनांची एका बाबतीत एकरूपता असते ‘घरी परतायचे.’
मला अचानक आठवली ती महाबळेश्वरची सायंकाळ. महाबळेश्वरला जायचे म्हटले म्हणजे सूर्यास्त, सूर्योदय पाहिलाच पाहिजे आम्ही आणि आमच्यासारखे आलेले शेकडो प्रवासी त्या बॉम्बे पॉइंटवर जमलो होतो; आणि अगदी नजर न हालविता ती रम्य सायंकाळ आपल्या नजरेत भरून घेत होतो, पण मला एक गंमत जाणवली-दिवसभर प्रकाशदानाचे काम करून अस्ताला जाणाऱ्या त्या सहस्ररश्मीलाही कशाची तरी ओढ लागली असावी! किती वेगाने उतरत होता तो. ते लाल वर्तुळ अस्ताला गेले, पण तरीही मागे आकाशात उरला ‘लाल रक्तिमाच!’ अशाच एका रम्य सायंकाळच्या दर्शनाने कूणा कवीची प्रतिभा पल्लवित झाली आणि तो म्हणाला, “उदय आणि अस्त दोन्ही स्थिती महात्म्यांना समानच असतात.”
सायंकाळ म्हणजे संधिकाल. दिवस आणि रात्र यांना जोडणारा दुवा. त्यामुळे या दोघांच्यातील साऱ्या चांगल्या गोष्टी त्यात एकवटतात. खेडेगावात तर ही सायंकाळ घरी परतणाऱ्या गुरांच्या ‘गोरजाने’ अधिक धूसर होते. त्यांच्या गळ्यांतील घंटांचा नाद सारे वातावरण भरून टाकतो. वेगाने घरटयांकडे परतणाऱ्या पक्ष्यांच्या रांगा दृष्टीस पडतात. तीच ओढ त्यांच्या पंखांत उतरलेली असते.
पाहता पाहता संधिप्रकाश संपतो आणि तमिस्रा आपले आधिपत्य गाजवू लागते. गावागावांत दूरवर दिवे लुकलुक लागतात. त्याचवेळी आकाशात एकामागून एक चांदण्या चमक लागतात.
प्लिज नोट: मला आशा आहे तुम्हाला हा रम्य सायंंकाळ वर निबंध (Romantic evening Essay in Marathi) आवडला असेल.
जर तुमच्या कडे सुद्धा Romantic evening Nibandh वर अशाच प्रकारे कोणता निबंध असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंद करा. आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुम्ही दिलेला निबंध खूप लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करु..
तसेच तुम्हाला हा रम्य सायंंकाळ वर मराठी निबंध आवडला असेल तर Whatsapp आणि facebook द्वारे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.