साधनाताई आमटे वर निबंध | Sadhanatai Amte Essay in Marathi | Sadhanatai Amte Nibandh

Sadhanatai Amte Essay in Marathi | Sadhanatai Amte Nibandh

आनंदवन म्हटले की पटकन डोळ्यासमोर बाबा आमटे येतात. पण साधनाताईंचे श्रेयही तितकेच मोठे. त्यांनी बाबांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहून त्यांच्या कार्यात खंबीरपणे साथ दिली.

साधनाताई पूर्वाश्रमीच्या इंदू त्यांचा जन्म घुले शास्त्री कुटुंबात झाला. मुरलीधर आमटे म्हणजे बाबा आमटे यांच्याशी विवाहानंतर समाजसेवेचा मार्ग स्वीकारला. दोघांनीही हजारो माणसे घडवली. बाबांची कल्पकता, जिद्द आणि कर्तृत्वाच्या जोडीला ताईची सहृदयता होती. बाबा आमटे यांनी अनेक प्रकल्प साकार केले. श्रमिक विद्यापीठ, युवाशक्तीच्या श्रमछावण्या, बालतरूची पालखी, भारत जोडो अभियान, धरणांसाठी, पर्यावरणासाठी अश्या अनेक लढयांमध्ये साधनाताईंनी समरसून बाबांना साथ दिली. बाबाही त्यांना घरकामात मदत करत असत. साधनाताईंनी विवाहानंतर चाकोरीपलीकडचे जीवन आत्मसात केले. नऊवारी रेशमी वस्त्रापासून ते खादीच्या जाड्या-भरड्या सहावारी पर्यंत साधनाताईनी जीवनाचा जो प्रवास केला त्यामुळे त्यांच्या जीवनाचे संदर्भच बदलून गेले.

बाबाच्या वादळी जीवनात त्या एकरूप झाल्या. विवाहपूर्वी साधनाताईंना घरच्या कामांची, गोसेवाची सवय होती. गाईला चारा घालणे, पाणी पाजणे ही कामे त्या स्वत: करीत. बाबा आमटे यांच्याशी विवाह झाल्या नंतर त्यांच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळाली. लग्नानंतर ते दोघेही वारो-याला गेले. तेथे हरिजन स्त्रिया त्यांना भेटायला येत. बाबा आणि साधनाताई अनेक देशभक्तीपर गीते त्यांच्याकडून म्हणून घेत. यानंतर बाबांनी आश्रम काढला. आश्रमचा सर्व कारभार साधनाताई बघत असत. यानंतर त्यांनी कुष्ठरोग निर्मुलन कार्य करण्यास सुरवात केली. कुष्ठरोगाचा संपूर्ण आभ्यास सुरु केला. त्यासाठी त्या बाबांबरोबर कलकत्याला गेले. विनोभा भावे यांनी हि त्यांना मदत केली. आनंदवनात कितीही पाहुणे आले तरी साधनाताई त्यांच्यासाठी स्वयंपाक करीत असत. बाबा आनंदवनात बाबा महारोग्यचे जीवन घडवत होते. तर साधनाताई त्यांना या कामात मदत करीत होत्या. हळूहळू आनंदवनातील महारोग्याची संख्या वाढू लागली. आनंदवनात बाबांनी शेती व भाजीपाला लागवड करयला सुरुवात केली. आनंदवनातील जंगल जमीन शेतीखाली आली. संसारोपयोगी वस्तूचे उत्पादन या ठिकाणी होऊ लागले. यानंतर तेथे शेतकी कॉलेज सुरु झाले. याठिकाणी साधनाताई विद्यार्थांसाठी स्वयंपाक करत असे. अंध मुलांसाठी ‘ आनंद अंध विद्यालय’ स्थापन करण्यात आले. बाबांनी सोमनाथ प्रकल्प सुरु केला. तेथे तरुणांसाठी अनेक शिबीर घेण्यात आले. मग हेमलकसा हा प्रकल्प साकार झाला. आदिवासीच्या विकासासाठीच्या ह्या प्रकल्पातही ताईंनी बाबांना भरभरुन साथ दिली. बाबांना मदत करण्याबरोबरच आपली दोन्ही मुले विकास आणि प्रकाश ह्यांनाही साधनाताईंनी उत्तम संस्कार देऊन आपल्या कार्यात सामिल करुन घेतले. आज त्यांची नातवंडे त्यांचे हे कार्य पुढे नेत आहेत.

प्लिज नोट: मला आशा आहे तुम्हाला हा साधनाताई आमटे वर निबंध (Sadhanatai Amte Essay in Marathi) आवडला असेल.

जर तुमच्या कडे सुद्धा Sadhanatai Amte Nibandh वर अशाच प्रकारे कोणता निबंध असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंद करा. आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुम्ही दिलेला निबंध खूप
लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करु..

तसेच तुम्हाला हा साधनाताई आमटे पर मराठी निबंध आवडला असेल तर Whatsapp आणि facebook द्वारे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

Leave a Comment