स्वच्छ भारत अभियान वर निबंध | Swachh Bharat Abhiyan Essay in Marathi | Swachh Bharat Abhiyan Nibandh

Swachh  Bharat  Abhiyan Essay in Marathi |Swachh Bharat  Abhiyan  Nibandh

स्वच्छ भारत अभियान किंवा स्वच्छ भारत मोहिम भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे. प्रधान मंत्रींनीं २ ऑक्टोबर २०१४ रोजी महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने स्वच्छ भारत अभियान जाहीर केले. राष्ट्रीय स्तरावर या अभियानाची दखल घेतली जात आहे. स्वच्छ भारत अभियान या मोहिमेचा एक मुख्य ध्येय आहे भारतातील सर्व शहरे आणि गावे “ओपन डेफकेशन फ्री” म्हणजेच हागणदारी मुक्त करणे. यासोबतच, स्वच्छ भारत अभियानाचा उद्देश भारतातील रस्ते, रस्ते व पायाभूत सुविधांची स्वच्छता करणे ही आहे. या मोहिमेविषयी सर्वोत्तम गोष्ट म्हणजे सर्व शाळांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये स्वच्छता आणि शौचालयांची उपलब्धता यावर लक्ष केंद्रित करणे ही आहे. या स्वच्छ भारत अभियान भारत अभियानातून भारतीयांना स्वच्छतेचे महत्व आणि फायदे यांची जाणीव करून देणे हे सुद्धा आहे.

विद्यार्थी म्हणून आपण स्वच्छ भारत अभियान, स्वच्छतेचे महत्व, स्वच्छतेचे फायदे असे विषय भाषण आणि निबंध स्पर्धांमध्ये पाहू शकता. काळजी करू नका! स्वच्छ भारत अभियान या विषयावर आम्ही येथे जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत . या लेखातील, आम्ही स्वच्छ भारत अभियान बद्दल आपल्याला महत्त्वाची माहिती दिली आहे ती तीन भागात विभागली आहे.

प्रथम, आम्ही आपल्याला स्वच्छ भारत मोहिमेबद्दल महत्वाची माहिती आणि डेटा देऊ. मग आपण याची अंमलबजावणी कशी झाली आणि काय परिणाम झाले हे सुद्धा पाहू. आणि शेवटी, आपण या विषयावर निष्कर्ष काढू. येथे, आम्ही आपल्याला मुख्य माहिती देत आहोत जी आपण नंतर भाषण, निबंध किंवा परिच्छेद स्वरूपात अनुरूप करण्यासाठी सुधारू शकता आणि आम्हाला माहित आहे की आपण असे बदल करण्यासाठी पुरक आहात. तर, चला जाणून घेऊयात स्वच्छ भारत अभियान चे महत्व, फायदे…

भाषण परिचय

भारत आणि पाश्चात्य देशांमधील एक सगळ्यात मोठा फरक म्हणजे स्वच्छता, त्यांची शहरे इतकी स्वच्छ आणि सुस्थितीत कशी?, असा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो, नाही का? आपण खूप मागे आहोत, लवकरच आपल्याला काहीतरी पावले उचलावी लागतील. आजच्या भाषणाचा विषयही तोच आहे. शुभ प्रभात, आज मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वात महत्त्वाकांक्षी मोहिमे बद्दल बोलणार आहे, आणि ती म्हणजे “स्वच्छ भारत अभियान”.

भारत सरकारचा स्वच्छ भारत मोहिम सुरु करण्याचा हा प्रथमच प्रयत्न नाही. १९९९ मध्ये, भारत सरकारने “संपूर्ण स्वच्छता अभियान” सुरू केले जे नंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्याचे “निर्मल भारत अभियान” असे नामकरण केले. परंतु, स्वच्छ भारत अभियानाला पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली संजीवनी मिळाली. आपल्या शपथविधीमध्ये सौच आणि स्वच्छता वरती बोलणारे ते जगातील पहिलेच नेते असावेत. यातून त्यांची स्वच्छतेबद्दलची आवड आणि संकल्प ही दिसतो. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय पातळीवर मोहीम राबविली आणि नागरिकांना भाग घेण्यास आवाहन केले. त्यांनी स्वतः झाडू हातात घेतला, काहींना हे राजकीय स्टंट वाटू शकतो, पण यासर्वातून एक फायदा झाला कि आपण भारतीय लोग स्वच्छतेबद्दल बोलू लागलो, वादविवाद, चर्चा होऊ लागली.

स्वच्छ भारत अभियानाने भारतातील स्वच्छता आणि त्याच्या निगडित कामांवर प्रचंड प्रभाव पाडला आहे आणि दिवसेंदिवस मोहिमेची प्रगती होत आहे. स्वच्छ भारत अभियान मोहिमेची स्वतःची अधिकृत वेबसाइट व अॅप आहे जेथे आपण या मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेऊ शकतो. अजून पर्यंत ३१ ,४०८ ,२८० घरांत शौचालये बांधली गेली, १४३,४९१ गावे/ ७९ जिल्हे / ३ राज्ये खुल्या शौचापासून मुक्त झाली आहेत. विविध राजकारणी, सेलिब्रिटिज, अभिनेते आणि क्रीडापटूंनी या मोहिमेत सहभाग घेतला होता आणि या अभियानाची क्षमता आणि पोहोच वाढवून दिली. सचिन तेंडुलकर, कमल हसन, अनिल अंबानी, विराट कोहली, प्रियांका चोप्रा आणि असेच अनेक जणांनी झाडू हातात घेतला आणि रस्ते साफ केले. मोदींच्या या अभियानाचा एक चांगला प्रचार केला. या मोहिमेचे लक्ष्य आहे की, महात्मा गांधींच्या १५० व्या जयंती पर्यंत ग्रामीण भारतात १२ दशलक्ष शौचालये, तसेच शहरांत स्वच्छतेसाठी विविध सेवा उपलब्ध करून देण्यात येतील.

२०१९ पर्यंत भारताला ओपन डेफकेशन फ्री (ओडीएफ) बनवणे हे स्वछ भारत अभियानाचा प्राथमिक उद्दिष्ट आहे. स्वच्छ भारत अभियान हा एक खूप मोठा प्रकल्प आहे आणि ३० लाखांपेक्षा अधिक सरकारी कर्मचारी तसेच शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या मोहिमेत भाग घेतला आहे, या मोहिमे अंतर्गत भारताच्या ४०४१ शहरे आणि गावांना १.९६ लाख कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.

या मोहिमेने केलेल्या जागृतीने अनपेक्षित बदल घडत आहेत, भारतातील हिंदी चित्रपट जगतातील (बॉलीवूड) सुपरस्टार अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या “शौचालय” नावाच्या चित्रपटाद्वारे भारतातील खुल्या शौचाच्या समस्येच्या निर्मूलनास समर्थन देण्यास सुरुवात केली आहे. हा चित्रपट ग्रामीण भारतातील स्त्रियांच्या समस्यांवर प्रकाश टाकतो, ग्रामीण भागात शौचालये बांधण्याची आवश्यकता आहे. असा विषय एका दिग्गज कलाकाराने करणे मोठी गोष्ट आहे, याचा अर्थ असा आहे की स्वछता विषयावर लोग आता विचार करू लागली आहेत.

स्वच्छतेचे फायदे / महत्व

आपल्या जीवनात स्वच्छतेचे महत्व कोणीही नाकारू शकत नाही. स्वच्छ परिसर, हवा, पाणी, वातावरण कोणाला नकोसे असते. स्वच्छतेने रोगराई नाहीशी होते, आजार पसरत नाहीत, आणि आपली जीवन शैलीही बदलून जाते. स्वच्छ परिसरातील लोग मॉर्निंग वॉल्क किंवा जॉगिंग ला जास्त जातं दिसतात, अश्या चांगल्या सवयीचा आपली जीवनावर खूप परिणाम होतो. स्वच्छ पटांगणात मुले खेळतात, आपले विडिओ गेम, मोबाईल दूर करून मैदानात येतात, ऍक्टिव्ह होतात. याचा फायदा असा होतो कि मुलांचा अभ्यासाचा ताण कमी होतो, ती खूष राहू लागतात.

आपल्याया हे सगळे माहीत आहे, पण तरीही आपण या साठी काहीच करत नाही. आपण आपले घर स्वछ ठेवतो आणि परिसराकडे दुर्लक्ष करतो. घर आपले परिसर दुसर्यांचा या विचाराने आपल्या भारताचा ऱ्हास केला आहे. स्वच्छता हे फक्त सरकार चे काम नाही, हां त्यांची जबाबदारी जरूर आहे. सरकारने योग्य त्या सुविधा पुरवल्यातच पाहिजेत. पण जो पर्यंत आपण स्वच्छता-प्रिय होत नाही, स्वच्छतेचे महत्व, फायदे जाणून घेत नाही तो पर्यंत काहीही बदल होणार नाही.

जर आपल्याला स्वच्छ भारतचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर, सरकार आणि आपल्याला एकत्र काम करावेच लागेल. सरकारच्या “स्वच्छ भारत अभियान” मध्ये भाग घ्यावा लागेल.अश्या मोहिमेचा साथ दिला पाहिजे.

निष्कर्ष

आपण येथे मूलभूत स्वच्छताविषयक समस्या आणि संबंधित पायाभूत सुविधांशी व्यवहार करीत आहोत, त्यामुळे अचानक दैदिप्यमान फरक जाणवेल असे स्वप्न पाहणे थोडे अवास्तवच ठरेल. इथे लोकांना बदलायची गरज आहे, हे फक्त एकट्या सरकारचे काम नाही. आपल्यात स्वच्छतेची, सुंदरतेची आवड निर्माण झाली पाहिजे या शिवाय कुठलाच मार्ग नाही. स्वच्छ भारत मोहिमेची सुरूवात सरकार आणि नागरिक भागीदारीपासून झाली परंतु आता दिसते की फक्त सरकारच काम करत आहे, आम जनता त्यांची साथ सोडत आहे. अशी प्रचंड कार्ये साध्य करण्यासाठी सरकार आणि जनतेची भागीदारी आवश्यक आहे नाही तर ते यशस्वी होणार नाही. सरकार त्यांचे काम करत आहे पण जनतेने आपली कर्तव्ये पार पाडली पाहिजेत. लोकशाहीत आपल्याला अधिकार मिळतात, परंतु आपण हे विसरतो की अधिकारांसोबत कर्तव्ये ही येतात. आपण आपली कर्तव्य विसरतो आणि केवळ अधिकारांसाठी आंदोलन करतो. भारत स्वच्छ करण्यासाठी आपण लोकांना पुढाकार घेण्याची गरज आहे, केवळ सरकारच हे करू शकत नाही.

भाषणाचा शेवट

आज मी तुम्हा सर्वांना स्वच्छतेची शपथ घेण्याची विनंती करतो. अशा चांगल्या कारणासाठी सरकारला समर्थन देऊयात. या देशाचे भविष्य आपल्या, युवांच्या आहेत आहे. लक्षात ठेवा,”कुठलाही देश परफेक्ट नसतो तो बनवावा लागतो“. माझ्या बरोबर म्हणा, “आज मी ग्रीन आणि क्लीन इंडिया बनविण्यासाठी प्रतिज्ञा घेतो, मी रस्त्यावर कचरा फेकणार नाही आणि कुणाला फेकू ही देणार नाही. मी माझ्या घरच्यांना आणि मित्रांना स्वच्छतेचे महत्व पटवून देईन. मी माझ्या भारताला स्वच्छ आणि सुंदर बनवेन कोणी साथ दिली किंवा नाही दिली तरी”. स्वच्छ भारत समृद्ध भारत. जय हिंद, जय भारत…

“आरोग्य हेच धन” अशी म्हण प्रचलित आहे पण आरोग्य व्यवस्थित राखण्यासाठी काही सवयी अंगीकारण्याची गरज असते. यापैकी सगळ्यात महत्त्वाची सवय म्हणजे स्वच्छता. आरोग्य हे पैशापेक्षा मौल्यवान आहे, गमावलेले पैसे कमावता येऊ शकतात पण आरोग्य परत मिळवणे कठीण असते. म्हणून आरोग्यदायी सवयी लावणे खूप महत्त्वाचे आहे. मानवी शरीर आणि मन जोडलेले आहेत, त्यामुळे जर आपले शरीर स्वच्छ असेल तर मनही उल्हासित राहते. निरोगी जीवनशैली आणि आरोग्यदायी सवयी असलेली व्यक्ती दीर्घ आणि सुखी जीवन जगते.

धुळी मध्ये जंतू असतात, ते हवेवाटे रोग पसरवतात. आपण क्रीडांगणातून किंवा शाळेतून घरी परत आल्यावर हात पाय धुतले पाहिजे किंवा स्नान केले पाहिजे . नियमित स्नान चांगली सवय आहे; त्याने आपले शरीर स्वच्छ आणि ताजे राहते. जेवणानंतर हात धुतले पाहिजेत, दिवसातून दोनदा ब्रश केला पाहिजे, जीभ क्लीनरचा वापर केला पाहिजे. भांडी आणि कपडे वेळेवर स्वच्छ करणे आवश्यक आहे. कपाटामध्ये डांबर गोळ्या ठेवल्याने कपड्याना वास लागत नाही. या छोट्या छोट्या सवयी आपल्याला निरोगी आयुष्याकडे नेतात.

रस्त्यावरील चाट ची चव चांगली लागते, पण स्वच्छतेबद्दल काय? आपण कधी रस्त्यावरील अन्न विक्रेत्याच्या हातांची, भांड्यांची तपासणी केली आहे का? ते पदार्थ कसे स्वच्छ करतात हे पाहिले आहे का? हे विक्रेते हातमोजे वापरत नाहीत आणि खाद्यपदार्थ उघड्यावर ठेवले जातात, त्यावर माश्या बसतात, धूळ उडते. या अश्या सवयी आपल्या स्वास्थासाठी चांगल्या नाहीत. आपणास अश्या सवयी बदलण्याची गरज आहे.स्वच्छतेच्या अश्या छोट्या छोट्या सवयीचा कंटाळा करून, दुर्लक्ष करून आपण आपल्या आरोग्यासोबत खेळत आहोत.

स्वच्छ भारत अभियान २०१८ अपडेट्स

खालील माहीतच वापर देखील तुम्ही निबंध किंवा भाषण मध्ये करू शकता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या नव वर्ष भाषणात एक खूप मोठी घोषणा केली आहे. त्याबद्दलची माहिती खालीलप्रमाणे:

स्वच्छता सर्वेक्षण २०१८ हे जगातील सर्वात मोठे सर्वेक्षण असणार आहे जे ४ जानेवारी ते १० मार्च २०१८ दरम्यान होणार आहे. शहरी क्षेत्राच्या स्वच्छतेच्या यशाचे मूल्यांकन करण्यासाठी हे स्वच्छता सर्वेक्षण आयोजित केले जाणार आहे. हे सर्वेक्षण चार हजारांहून अधिक शहरातील ४० करोड पेक्षा अधिक लोकसंख्येला समाविष्ट करेल.

या सर्वेक्षणात कचरा संकलन, कचरा उचलण्याची वाहतूक सुविधा, वैज्ञानिक पद्धतींचा वापर करून कचऱ्यावर प्रक्रिया करणे, वागणूकीत बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नांचा समावेश करणे, क्षमता बांधणीसाठी घेतलेली नवीन पावले, जनतेचा सहभाग आदी मापदंडांचा वापर होणार आहे. या अभियाना अंतर्गत रहिवाश्याची प्रतिक्रिया सुद्धा घेतली जाईल. सर्वेक्षण अधिकारी स्वच्छता अॅपच्या वापराचे विश्लेषण करतील आणि विविध प्रकारच्या सेवा केंद्रामध्ये सुधारणांबद्दल देखील विचार करतील.

पी.एम. मोदी पुढे आपल्या भाषणात म्हणाले,”स्वच्छतेचे पालन करणे ही केवळ सरकारचीच जबाबदारी नाही तर प्रत्येक नागरिक आणि संघटनांची जबाबदारी आहे,आणि प्रत्येक नागरिकाला येत्या दिवसांमध्ये स्वच्छतेच्या सर्वेक्षणात सक्रीय सहभाग घेण्यास मी आवाहन करतो. मला खात्री आहे की आतापर्यंत कोरडा आणि ओला कचरा गोळा करण्यासाठी निळा आणि हिरव्या कचरापेटी चा वापर करण्याची सवय तुम्हाला झाली असेलच”.

पुढे ते म्हणाले “कचरा गोळा करणे, कमी करणे, पुनर्वापर करणे आणि पुनर्चक्रण करण्याचे तत्व अतिशय प्रभावी आहे. आता या सर्वेक्षणाच्या आधारावर शहरांची श्रेणी निश्चित करण्यात येईल. जर आपल्या शहराची लोकसंख्या एक लाखापेक्षा जास्त असेल तर रँकिंग राष्ट्रीय स्तरावर केली जाईल आणि जर आपल्या शहराची लोकसंख्या एक लाखापेक्षा कमी असेल तर एक प्रादेशिक स्तरावर स्थान दिले जाईल. या स्वच्छता सर्वेक्षणात सर्वोच्च दर्जा प्राप्त करणे हे आपले स्वप्न असणे आवश्यक आहे आणि आपण या दिशेने सर्व प्रयत्न केले पाहिजे. ४ जानेवारी ते १० मार्च २०१८ पर्यंत आपण स्वच्छतेच्या सर्वेक्षणात मागे पडत नाही याची खात्री बाळगा. हे प्रत्येक शहरातील संभाषण बिंदू बनले पाहिजे आणि तुमच्यापैकी प्रत्येकाचे एक स्वप्न असावे – ‘आमचे शहर – आमचे प्रयत्न’, ‘आमची प्रगती – देशाची प्रगती’. आपण पुन्हा एकदा बापूंचे स्मरण करून स्वच्छ भारत निर्माण करण्याचा संकल्प घेऊयात.”

प्लिज नोट: मला आशा आहे तुम्हाला हा स्वच्छ भारत अभियान वर निबंध (Swachh Bharat Abhiyan Essay in Marathi) आवडला असेल.

जर तुमच्या कडे सुद्धा Swachh Bharat Abhiyan Nibandh वर अशाच प्रकारे कोणता निबंध असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंद करा. आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुम्ही दिलेला निबंध खूप लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करु..

तसेच तुम्हाला हा स्वच्छ भारत अभियान वर मराठी निबंध आवडला असेल तर Whatsapp आणि facebook द्वारे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

Leave a Comment