तंत्रज्ञान बदलतेय वेगात वर निबंध |Technology is changing rapidly Essay in Marathi |Technology is changing rapidly Nibandh

Technology is changing rapidly Essay in Marathi |Technology is changing rapidly Nibandh

गेल्या दशकभरात तंत्रज्ञान झपाट्याने बदलत असून आज नवी वाटणारी गोष्ट उद्या लगेच जुनी होत आहे. यामुळे ग्राहकांसमोर एकाच वेळी अनेक पर्याय खुले होत असून योग्य पर्याय निवडताना ते गोंधळून जात आहेत. सध्या अॅण्ड्राईड या मोबाईल फोन्सच्या ऑपरेटिंग सिस्टिमबद्दल बरीच चर्चा होत असली तरी त्यापेक्षाही चांगली ऑपरेटिंग सिस्टिम कधीही बाजारात दाखल होऊ शकेल अशी परिस्थिती आहे.

सुमारे दशकभरापूर्वीपर्यंत वॉकमन तरुणांच्या गळ्यातला ताईत होता. परंतु, त्यानंतर डीजिटल तंत्रज्ञानात झालेल्या अविश्वसनीय प्रगतीमुळे वॉकमन इतिहासजमा झाला असून त्याजागी एमपीथ्री प्लेअरपासून एमपी5 प्लेअरपर्यंत अनेक छोटेखानी, सुटसुटीत आणि वॉकमनच्या शतपट क्षमता असलेली गॅजेट्स सर्वांना रिझवू लागली आहेत. सध्याचे दिवस ब्लॅकबेरी, आयपॉड आणि किडल बुकरिडर्सचे आहेत. पण हेही काहीसे जुने झाले असून आता त्यांची स्पर्धा अॅण्ड्राईडशी आहे.

तंत्रज्ञान प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वत:वरच मात करत वेगाने प्रगती करत आहे. विशेषत: स्मार्टफोन क्षेत्रात हे जवळून अनुभवता येते. आयफोनचा थ्रीजीएस बाजारात आल्यानंतर आपण घेतो न घेतो तोच त्यांचा आयफोन4 बाजारात दाखल होतो. एखादा टचस्क्रीन फोन घेतल्यानंतर त्याचे फीचर्स पाहता याहून चांगला फोन मिळणे शक्य नाही असे वाटत असतानाच गुगलचा अॅण्ड्राईड लाँच होतो. 2000 मध्ये अॅपलने त्यांच्या आयपॉडसाठी संगीत विकण्यासाठी आयट्यून्स स्टोअर हे ऑनलाईन ‘दुकान’ सुरू केले. त्यानंतर लगेच सोनीने स्वत:चे प्लेस्टेशन स्टोअर तर नोकियाने ओव्ही स्टोअर सुरू केले. आता सॅमसंगही ‘सॅमसंग अॅप्स स्टोअर’ सुरू करत आहेत. अशा अनेक अॅप्लीकेशन्समुळे बाजार फुलला असून ग्राहकांसमोर अनेक पर्याय खुले झाले आहेत.

23 वर्षांच्या सागरचेच उदाहरण घ्या. मोटोरोला माईलस्टोन घेतल्यापासून तो एक क्षणही हातातून खाली ठेवत नाही. हा फोन गुगलच्या अॅण्ड्राईड प्लॅटफॉर्मवर चालतो तसेच सध्या उपलब्ध असलेल्या हाय एन्ड फोन्सपैकी एक आहे. हा फोन आणि त्यातील सर्व फीचर्स वापरणे अगदी सोपे आहे. टेक्नोसॅव्ही असलेल्या सागरच्या मते गुगलने तयार केलेली अॅण्ड्राईड ही ऑपरेटिंग सिस्टीम पुढील काळात अॅपलच्या ऑपरेटिंग सिस्टीमला (अॅपल ओएस) नक्की मागे टाकेल. अॅण्ड्राईड ही ओपन सोर्स नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम असून सॉफ्टवेअर्स डेव्हलपर्सना या सिस्टीमवर वैविध्यपूर्ण अॅप्लीकेशन्स तयार करता येतात. हे अॅप्लीकेशन्स प्रत्येकाच्या वैयक्तिक गरजा भागवण्यासाठीही तयार केले जाऊ शकतात. अॅपल किंवा इतर कंपन्यांचे ऑपरेटिंग सिस्टीम्स क्लोज्ड नेटवर्क सिस्टीम्स असून त्यावर प्रत्येकाच्या गरजा भागवणारी अॅप्लीकेशन्स डेव्हलप करणे शक्य होत नाही.

एका अॅप्लीकेशन डेव्हलपर्सच्या मते पुढील काळात अॅण्ड्राईडला अधिक महत्त्व येण्याचे आणखी एक कारण आहे. या सिस्टीममुळे डेव्हलपर्सना वैविध्यपूर्ण अॅप्लीकेशन्स तर तयार करता येतातच पण ब्रॉडकॉम कॉर्पोरेशन, गुगल, एचटीसी, इंटेल, एलजी, मोटोरोला, एनव्हीडीया, सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स, स्प्रिंट नेक्स्टेल आणि टी मोबाईलसारख्या हँडसेटची निर्मिती करणार्‍या अनेक कंपन्या त्यांच्या नवीन उत्पादनांसाठी अॅण्ड्राईडचाच वापर करत आहेत. या ऑपरेटिंग सिस्टीममुळे त्यांच्या हँडसेट्सनाही चांगली मागणी निर्माण होईल. सध्या भारतात सॅमसंग गॅलक्सी आणि व्हेव, एचटीसी एरिया, ड्रिम अॅण्ड डिझायर सारखे मोबाईल फोन्स तसेच सॅमसंग गॅलक्स टॅब, डेल स्ट्रीक आणि ऑलिव्ह पॅड हे टॅब्लेट पीसीज विशेष लोकप्रिय आहेत. सर्वसामान्य ग्राहकाला कोणता मोबाईल फोन घ्यावा हे ठरवणे अवघड जात आहे. एकाच वेळी एकाच श्रेणीतील दहा-पंधरा मोठी नावे ऐकून तो बुचकळ्यात पडतो. अशा वेळी प्रत्येक मोबाईल फोनचा तपशील गोळा करून त्याचा तुलनात्मक अभ्यास करण्याऐवजी तो मोठ्या प्रमाणावर विकले जाणारे उत्पादन घेण्याचा निर्णय घेतो.

दुसर्‍या एका अॅप्लीकेशन डेव्हलपरच्या मते, आजच्या युवा पिढीच्या मागण्या सतत वाढत असून त्यामुळे डेव्हलपर्सनाही नवीन आणि वैशिष्ट्यपूर्ण अॅप्लिकेशन्स तयार करण्याची प्रेरणा मिळते. तसेच मोबाईल कंपन्यांनाही इतर कंपन्यांच्या स्पर्धेवर मात करण्यासाठी अशी अॅप्लिकेशन्स हवी असतात. त्यासाठीच मोबाईल कंपन्यांना ऑपरेटिंग सिस्टिममध्ये बदल हवे असतात. ऑपरेटिंग सिस्टिम शक्यतो ओपन सोर्स प्रकारची असावी म्हणजे डेव्हलपर्संना त्यात विविध अॅप्लिकेशन्स तयार करण्याची संधी मिळते. विविध मोबाईल फोन्स आणि त्यांच्या अॅप्लिकेशन्समध्ये सदोदिद सुधारणा होत असतात. या सुधारणांमुळे इतर कंपन्यांच्या मोबाईल फोन्सशी स्पर्धा सुरू असतेच पण त्याच कंपनीच्या पूर्वीच्या मॉडेल्सवरही आपोआप मात केली जाते.

अॅण्ड्राईडच्या ऑफिशियल ब्लॉगवर त्यांच्या एसडीके टेक विभागाचे प्रमुख झेव्हिअर ड्युक्रोहेट हे लिहितात, ‘अॅण्ड्राईड 2.3 (जिंजरब्रेड) या अॅण्ड्राईडच्या नवीन आवृत्तीमध्ये अनेक नवीन प्लॅटफॉर्म टेक्नॉलॉजीज आणि एपीआयचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे डेव्हलपर्संना उत्तमोत्तम अॅप्लिकेशन्स तयार करता येतील. अचूक मोशन प्रोसेसिंगसाठी डेव्हलपर्स गायरोस्कोपसारख्या अनेक नवीन सेन्सरचा वापर करू शकतील. व्हीपी 8 आणि वेब एमसारख्या नवीन व्हिडिओ प्लॅटफॉर्ममुळे तसेच एएसी आणि एएमआर वाईड बॅड एक्नोडिंगमुळे ग्राहकांना मल्टीमिडियाचा उत्कृष्ट अनुभव मिळेल. पुढील बाजूस असलेला कॅमेरा, एसआयपी/व्हीओआयपी आणि निअर फिल्ड कम्युनिकेशन्स या सुविधांमुळे डेव्हलपर्सनी तयार केलेल्या अॅप्लिकेशन्सची क्षमता वाढेल.’ या ब्लॉगवरील सर्व गोष्टींचा अर्थ कळला नाही तरी नवीन अॅण्ड्राईडमुळे डेव्हलपर्संना अधिक चांगले अॅप्लिकेशन्स तयार करणे शक्य होईल आणि ग्राहकांना त्याचा उत्तम अनुभव मिळेल हे स्पष्ट होते. सध्या तरी अॅण्ड्राईडची चलती आहे. पण, त्यावर मात करण्यासाठी दुसरी एखादी ऑपरेटिंग सिस्टिमही कुठे तरी तयार होत असेल.

प्लिज नोट: मला आशा आहे तुम्हाला हा तंत्रज्ञान बदलतेय वेगात वर निबंध (Technology is changing rapidly Essay in Marathi) आवडला असेल.

जर तुमच्या कडे सुद्धा Technology is changing rapidly Nibandh वर अशाच प्रकारे कोणता निबंध असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंद करा. आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुम्ही दिलेला निबंध खूप लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करु..

तसेच तुम्हाला हा तंत्रज्ञान बदलतेय वेगात वर मराठी निबंध आवडला असेल तर Whatsapp आणि facebook द्वारे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

Leave a Comment