Vinoba Bhave Essay in Marathi | Vinoba Bhave Nibandh
थोर गांधीवादी आचार्य आणि भूदान चळवळीचे प्रवर्तक विनोबा भावे यांचा आज जन्मदिन. कोकणातील रायगड जिल्ह्यात गागोदे या पेण तालुक्यातील गावी 11 सप्टेंबर 1895 रोजी विनायक नरहर भावे यांचा जन्म झाला. भगवद्गीतेचे सार सोप्या रसाळ शैलीत ‘गीताई’ आणि ‘मधुकर’ सारख्या ग्रंथांतून सांगणार्या विनोबांची भेट 7 जून 1916 रोजी मोहनदास गांधी नावाच्या एका महात्म्याशी झाली आणि त्यांच्या आयष्यानेच एक नवे वळण घेतले.
त्याक्षणापासून ब्रह्मचर्याची शपथ घेऊन त्यांनी जीवनसाधनेस सुरूवात केली. वाई मुक्कामी स्वामी केवलानंद सरस्वतींच्या चरणाशी उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, शांकरभाष्य व पातंलजोगाचे शिक्षण घेतले. पुढे 1921मध्ये जमनालाल बजाजांनी साबरमतीच्या आश्रमाची शाखा वर्ध्याला काढली. तिचे संचालक म्हणून 8 एप्रिल 1921 रोजी महात्माजींच्या 1940 त्या वैयक्तिक सत्याग्रहाचे गांधीजींनी निवडलेले पहिले ते सत्याग्रही होते. 1951 ते 53 हा भूदान यात्रेचा कालावधी वगळता सारे आयुष्य वर्ध्याच्या पवनार आश्रमात काढलेल्या विनोबांनी 15 नोव्हेंबर 1982 रोजी तेथेच आपली देहयात्रा संपविली. सरकारने त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ देऊन सन्मान केला.
प्लिज नोट: मला आशा आहे तुम्हाला हा विनोबा भावे वर निबंध (Vinoba Bhave Essay in Marathi) आवडला असेल.
जर तुमच्या कडे सुद्धा Vinoba Bhave Nibandh वर अशाच प्रकारे कोणता निबंध असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंद करा. आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुम्ही दिलेला निबंध खूप लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करु..
तसेच तुम्हाला हा विनोबा भावे वर मराठी निबंध आवडला असेल तर Whatsapp आणि facebook द्वारे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.