What can I do for a clean India? Essay in Marathi | What can I do for a clean India? Nibandh
“सप्टेंबर ८, २०१७ पर्यंत विद्यार्थी, सामान्य जनता आणि पोलीस कर्मी यांकडून “मी स्वच्छ भारतासाठी काय करू शकते/शकतो” या विषयावर १ कोटी निबंध प्राप्त करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘संकल्प से सिद्धी’ उपक्रमाचा एक भाग आहे जो “२०२२ पर्यंत नवीन भारत” या प्रकल्पाचा महत्वपूर्ण हिस्सा आहे. या निबंध स्पर्धेचा उद्देश समाजात, मुख्यतः तुमच्या आमच्या सारख्या विद्यार्थी आणि युवाच्या मनात स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे. प्रधान मंत्री मोदी यांची हि मोहीम कौतुकास्पद आहे, स्वच्छतेचा संदेश विद्यार्थी समूहापर्यंत पोहचवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
शिक्षक कनिष्ठ आणि वरिष्ठ शालेय विद्यार्थ्यांना “मी स्वच्छ भारतासाठी काय करू शकते/शकतो ? ” या विषयावर २५० शब्दांचा निबंध लिहण्यास सांगत आहेत. आपण विद्यार्थी आणि देशाचे युवा या महान मोहिमेत सहभाग घेऊ इच्छित आहात आणि त्यासाठी इंटरनेटवर या विषयावरच्या सॅम्पल निबंधाचा शोध घेत आहात. तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.
इथे दिलेला निबंध मी याच कारणासाठी लिहला आहे कि जेणेकरून आपण शब्दांना एकत्र कसे जोडायचे ते शिकू शकाल. मी तुम्हाला असे सुचवितो कि या निबंधाचे कॉपी पेस्ट करू नका. उलट या नमुना निबंधाचाची संकल्पना समजून घ्या आणि आपल्या स्वत:च्या भाषेत, आपल्या स्वत:च्या भावना आणि पद्धतीं टाकून एक सुंदर निबंध लिहा. निबंधाचा विषय आहे कि मी काय करू शकते किंवा करू शकतो, म्हणजे इथे तुमचे स्वतःचे मनोगत आणि उपाय द्यायचे आहेत ना कि दुसरे काय करू शकतात, मी आशा करतो कि यातला फरक तुम्हाला कळला असेल. मला असा वाटत कि हा निबंध तुम्ही प्रथम पुरुषात लिहावा, ते जास्त योग्य ठरेल…
जेव्हा मी चित्रपटांमध्ये किंवा युट्यूब वर स्वच्छ विदेशी शहरे आणि खेडी पाहतो, मला आश्चर्य वाटते की ही ठिकाणे किती सुंदर, व्यवस्थित आणि स्वच्छ आहेत? हिमाच्छादित स्वित्झर्लंडच्या पर्वतरांगा, इटली मधल्या फुलांनी भरलेल्या बाल्कनी आणि ऑस्ट्रेलियाच्या सुंदर किनारपट्ट्या आपल्याला त्यांची सुंदरता आणि स्वच्छतेने मंत्रमुग्ध करतात. आपल्या भारतात हि अशा आश्चर्यकारक प्रवास स्थळे, ऐतिहासिक स्मारके, भव्य किल्ले यांची कमी नाही परंतु ते त्यांच्या परराष्ट्रीय समकक्षांसारखे का दिसत नाहीत?
देशाला स्वच्छ करणे हे केवळ सरकारचे काम नाही, होय, ते पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी बाध्य आहेत परंतु स्वछतेची आवड मुळतः जनतेमध्ये असावी लागते. आपण भारतीयांची हीच प्राथमिक समस्या आहे. आपण दुसऱ्याना दोष देत राहतो मात्र स्वतः काहीही करत नाही. सरकार आणि अन्य लोकांना दोष देण्याऐवजी मी आपल्या राष्ट्र पित्याकडून एक गोष्ट शिकलो …
तुम्हाला तो बदल व्हावा लागेल जो तुम्हाला जगात पाहायचा आहे – महात्मा गांधी
जर मला माझा देश स्वच्छ पाहायचा असेल तर मला बदलण्याची गरज आहे. मी माझ्यामध्ये बदल न करता तो इतरांकडून होण्याची अपेक्षा करू शकत नाही. मी माझ्या देशाला स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी आणि ठेवण्यासाठी ज्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करेन त्या अश्या आहेत…
मी घरी ओला व कोरडा कचरा वेगळा करीन आणि तो योग्य कचराकुंडीतच टाकेल. मी तो कचरा रस्त्यावर किंवा खिडकीतून बाहेर टाकणार नाही आणि मी माझ्या कुटुंबियांना हि असे करण्यास प्रवूत्त करेल. मी आमच्या कॉलनीच्या अध्यक्ष्याना विनंती करेन कि हा नियम सगळ्यांसाठी अनिवार्य करावा.
मी रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा करणार नाही, चॉकलेट किंवा कँडी चे आवरण रस्त्यावर न टाकता खिश्यात ठेवीन आणि मग ते कचरा पेटीतच टाकेन.
माझ्या फोनमध्ये खूप सारे सोशल मीडिया ऍप्स आहेत, अजून पर्यंत मी त्यांचा उपयोग फक्त डीपी बदलणे किंवा फोटो पोस्ट करण्यासाठी करत होतो, पण यापुढे मी या माध्यमांचा वापर स्वच्छतेचा संदेश पसरवण्यासाठी हि करेन.
मी एकटा संपूर्ण भारताला स्वच्छ करू शकत नाही, परंतु माझ्यासारख्या राष्ट्राच्या कोट्यावधी युवकांनी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केल्यास, कोणीही आपणास जगामध्ये सर्वात स्वच्छ आणि सुंदर देश होण्यापासून थांबवू शकत नाही. देशाचे उज्ज्वल भविष्य आपल्या हातात आहे. जेव्हा मी माझे डोळे बंद करतो आणि तो भारत कसा असेल याची कल्पना करतो मला तो स्वर्गापरी भासतो. चला… एकत्र येऊ आणि आपल्यामध्ये हा छोटासा बदल घडवू ज्यात देश बदलण्याची ताकद आहे.
प्लिज नोट: मला आशा आहे तुम्हाला हा स्वच्छ भारतासाठी मी काय करू शकते/शकतो ? वर निबंध ( What can I do for a clean India? Essay in Marathi) आवडला असेल.
जर तुमच्या कडे सुद्धा What can I do for a clean India? Nibandh वर अशाच प्रकारे कोणता निबंध असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंद करा. आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुम्ही दिलेला निबंध खूप लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करु..
तसेच तुम्हाला हा स्वच्छ भारतासाठी मी काय करू शकते/शकतो ? वर मराठी निबंध आवडला असेल तर Whatsapp आणि facebook द्वारे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.