५०० व १००० च्या नोटा का बंद करण्यात आल्या? वर निबंध | Why 500 and 1000 notes were closed? Essay in Marathi | Why 500 and 1000 notes were closed? Nibandh

Why 500 and 1000 notes were closed? Essay in Marathi | Why 500 and 1000 notes were closed? Nibandh

सध्या भारतात खोट्या नोटांचे प्रमाण फारच वाढत चालले आहे. त्यात प्रामुख्याने ५०० व १००० च्या नोटा आहेत. सामान्य नागरिकाला त्या नोटा ओळखता येते हे अवघड आहे. या नोटांचा वापर टेररीसम व ड्रॅग डीलिंग अशा गोष्टींसाठी प्रामुख्याने केला जातो. तसेच सरकारने ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत काळे धन डिक्लेअर करण्यास सांगितले होते. ज्या लोकांकडे अशी अघोषित आय मोठ्या प्रमाणावर ५०० व १००० च्या नोटांमध्ये आहे त्या लोकांना आता ते वापरता येणार नाही. म्हणूनच या जुन्या नोटा बंद करून नवीन नोटा आलेल्या दिसतात.

सामान्य नागरिकांनी काय करावे ?

आपल्याकडे असणाऱ्या ५०० व १००० नोटा बॅंकांमध्ये किंवा पोस्ट ऑफिसांमध्ये ३० डिसेंबर पर्यंत परत करून नवीन नोटा घ्याव्यात. तुम्हाला तुम्ही दिलेली सर्व रक्कम मिळेल परंतु, १० ते २४ नोव्हेंबर मध्ये नोटांच्या रूपाने एका माणसाला जास्तीत जास्त ४००० रुपयेच मिळतील व उरलेली रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये मध्ये जमा होईल. २५ नोव्हेंबर पासून तुम्हाला ४००० पेक्षा पुढची रक्कम सुद्धा नोटांच्या रूपात मिळू शकेल.

पैसे कसे व किती काढावे ?

१० नोव्हेंबर पासून बँकांमधून तुम्ही दिवसाला दर माणसी जास्तीत जास्त १०००० व आठवड्याला जास्तीत जास्त २०००० असे पैसे तुमच्या खात्यातून काढू शकता. १८ नोव्हेंबर पर्यंत ए.टी.एम. मधून दिवसाला जास्तीत जास्त २००० व १९ नोव्हेंबर पासून दिवसाला जास्तीत जास्त ४००० असे पैसे काढू शकता.

खर्च कसा भागवावा ?

जास्तीत जास्त काढलेली रक्कम जर पुरत नसेल तर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, ई-बँकिंग, डिमांड ड्राफ्ट, चेक, ई-वॉलेट, ऑनलाईन यांचा वापर जिथे करता येतो तिथे करून आपल्या गरजा भागवता येतील.<br><br>

नव्या नोटांबद्दल थोडी माहिती

नवीन आलेल्या ५०० व २००० च्या नोटा ‘महात्मा गांधी (नवीन ) सिरीज ‘ मधील आहेत. ५०० रुपयाच्या नोटीवर मागे लाल किल्ला आहे. २००० रुपयाच्या नोटीवर मागे मंगळयान असून ते भारताची विज्ञानातील प्रगती दर्शवते.

प्लिज नोट: मला आशा आहे तुम्हाला हा ५०० व १००० च्या नोटा का बंद करण्यात आल्या? वर निबंध (Why 500 and 1000 notes were closed? Essay in Marathi) आवडला असेल.

जर तुमच्या कडे सुद्धा Why 500 and 1000 notes were closed? Nibandh वर अशाच प्रकारे कोणता निबंध असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंद करा. आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुम्ही दिलेला निबंध खूप
लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करु..

तसेच तुम्हाला हा ५०० व १००० च्या नोटा का बंद करण्यात आल्या? पर मराठी निबंध आवडला असेल तर Whatsapp आणि facebook द्वारे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

Leave a Comment